मू.पो. लोणी, ता. रिसोड जि. वाशीम महाराष्ट्र -४४४५०६

Untitled-1 copy

Contacts: 9823891114, 8806821991, 7767076788

Untitled-1 copy

ABOUT SHREE

 

सखाराम महाराजांचा जन्म महाराष्ट्रात तळणी (जि. जालना) येथे चैत्र शुद्ध नवमी, शके 1707 म्हणजे रामनवमीच्या (दि. 9 एप्रिल 1786 ) झाला.
वडिलांचे नाव बाळशास्त्री व आईचे नाव अहिल्या. त्यांचे वेदाध्ययन वाशीम येथे वे. शा. सं. बाळशास्त्री यांचेकडे झाले. बाळशास्त्री देवीचे उपासक. प्रत्यक्ष देवी भवानीने गुरु बाळशास्त्री यांना दृष्टांत देऊन सांगितले कि सखाराम साधा विद्यार्थी नसून तीन जन्मांचा योगी आहे. विद्याध्यायन संपल्यानंतर महराजांचे लग्न ता. 21 नोव्हेंबर 1800 ला झाले. नाममात्र विवाह व हळदीचा डाग या दोन गोष्टी सोडल्या तर महाराज नैष्टिक ब्रम्हचारी होते.
महाराजांनी गृहत्याग केला. पद्मतीर्थ (वाशीम), श्री पिंगलाक्षी देवीजवळ (रिसोड) व कमलजादेवीजवळ (लोणार) या पवित्र ठिकाणी व नंतर काशीला गंगेमध्ये जलस्तंभ योगाद्वारे महाराजांनी खडतर तपश्चर्या केली. काशीलाच त्यांनी मातेला भागीरथीचे दर्शन दिले.
नंतर महाराज फिरत फिरत लोणीला आले. येथेच भोलानाथला पांडुरंग दर्शन, एक शेर करडीचे 7 मन तेल काढून वाल्हूचे दारिद्र्य निरसन, फिटीजर, पुंजाजी पाटील, राघो, बापू ई. अनेकांना चमत्कार दाखवून वयाच्या 92 व्या वर्षी शके 1800 कार्तिक वद्य 14 ला (दि. 23 नोव्हेंबर 1878 ) ला महाराज समाधिस्थ झाले. महाराज मितभाषी होते. ते कोणाला स्वतःच्या पाया पडू देत नसत.त्यांनी कोणालाही गुरुमंत्र दिला नाही. आलेल्या भक्तांना जेवल्याशिवाय जावू देत नसत. भक्तांना जरी गोड धोड खाऊ घातले तरी त्यांची स्वतःच्या जेवणाची विशिष्ट पद्धत असे. अयाचित वृत्तीने आलेले डाळ, तांदूळ, ईत्यादि एकत्र करून अर्धवट शिजल्यानंतर त्यातील अर्धा हिस्सा गोमाता, श्वान, ईत्यादि प्राणिमात्राला दिल्यानंतर उरलेले अन्न स्वतः भक्षण करीत. या सर्व गोष्टीचे सविस्तर वर्णन सखाराम लीलामृत या ग्रंथात दिले आहे.

ABOUT SANSTHAN

श्री सखाराम महाराज संस्थान हे महाराष्ट्रातील लोणी (ता. रिसोड) ह्या विदर्भातील गावात आहे. लोणी हे गाव जगप्रसिद्ध लोणार सरोवर गावापासून 13 km . अंतरावर आहे. श्री. सखराम महाराजांचे भव्य मंदिर असून, संस्थानातर्फे विविध कार्यक्रम चालविले जातात. लोणी संस्थानाचा धार्मिक कार्याबरोबर अनेक सामाजिक कार्यात सहभाग आहे.
 
१. हैदराबाद मुक्ती – संग्रामातील लोणी संस्थानाचे योगदान स्वातंत्र्य चळवळ व विशेषतः हैदराबाद मुक्ती संग्रामाला लोणी संस्थानने सहकार्य केले. हैदराबाद संस्थानात निझामाचे राज्य होते. निझामाने रझाकार संघटना (semi military ) स्थापन करून जुलूम व अत्याचाराची सीमा ओलांडली. त्या मूळे स्वात्यंत्र चळवळी बरोबर निझामाची जुलुमी राजवट नष्ट करण्या साठी hyderabad State Congress चे झेंड्याखाली आंदोलन पेटले. सशत्र आंदोलनाला गती येण्यासाठी State congress चे भूमिगत आंदोलकांची camp काढण्यात आले. जिंतूर तालुक्याचा कॅम्प लोणीला स्थापन झाला. आर्थिक सहाया बरोबर , अन्डोलाकाची राहण्याची व जेवणाची व्यवस्था संस्थांमध्येच मंदिराच्या परिसरात करण्यात आली. जवळपास १२०० ते १५०० लोक लोणीस आले.
 
२. शैक्षणिक – संस्कृत पाठशाळा व श्री सखाराम महाराज विद्यालय संस्थानातर्फे सुरुवातीपासून शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करण्यात आले. जुण्याकाळात संस्थानातर्फे संस्कृत पाठशाळा चालविण्यात येत होती. या पाठशाळेत अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले. पाठशाळेत शिस्त व merit ला विशेष महत्व होते. नवीन विद्यार्थ्यास १ महिना ठेऊन त्याची सर्वांगीण परीक्षा घेतली जात असे. फक्त हुशार विद्यार्थाय्ना प्रवेश मिळत असे. लोणी गाव व आजूबाजूच्या खेड्यातील विद्यार्थ्यासाठी 1966 साली श्री सखाराम महाराज विद्यालय सुरु करण्यात आले. आता या विद्यालयात 5 ते 12 वी (Arts & Science ) पर्यंतच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. काळानुसार Convent सुद्धा सुरे करण्या आले आहे.
 
३ . वसतिगृह– गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह. ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षण, निवास व जेवण्याची निशुल्क व्यवस्था आहे. गरीब विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, वह्या इत्यादीचा पुरवठा.
 
४.गोशाला व वाचनालय संस्थानातर्फे गोशाला व वाचनालय चालविण्यात येते. वाचनालयात जुन्या दुर्मिळ ग्रंथाबरोबर नवीन उपयोगी पुस्तके उपलब्ध आहेत.
 
५.  इतर उपक्रम संस्थानातर्फे दरवर्षी विविध medical camps चे आयोजन करण्यात येते. या शिबिरामध्ये ग्रामीण गरीब जनतेला नामांकित Dr च्या सेवेचा फायदा विनामूल्य उपलब्ध करून दिला जातो. रोग्यांना औषधीचे निशुल्क वाटप केल्या जाते.